मंगळवेढा(प्रतिनिधी )जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी शोभा काळुंगे यांची तर उपाध्यक्षपदी शांताबाई धायगोंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मंगळवेढा तालुक्यातील महिलांच्या ज्या पतसंस्था आहेत त्यामध्ये सर्वाधिक ठेवी असलेली व ठेवीदार, कर्जदार सभासदांचा विश्वास प्राप्त केलेल्या धनश्री संस्थेच्या कार्यालयामध्ये नूतन संचालक मंडळाची 2023 ते 2028 या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासंबंधी सभा घेण्यात आली. त्यामध्ये सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी शोभा काळुंगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यासाठी सूचक विद्या जावीर व सुनीता नागणे यांनी अनुमोदन दिले.तर उपाध्यक्षपदासाठी शांताबाई धायगोंडे यांचाही एकमेव अर्ज प्राप्त झाला व यास दिपाली पाटील यांनी सुचक तर कल्पना गडदे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी काम पाहिले. यावेळी धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, सिताराम महाराज कारखान्याच्या कार्यकारी संचालक राजलक्ष्मी गायकवाड, शिवाजीराव पवार, किसन सावंजी, प्रभाकर कलुबर्मे, कल्याण रोकडे, ज्ञानदेव जावीर, ईश्वर गडदे, उमाकांत कनशेट्टी, गणेश शिंदे, श्रीशैल धायगुडे यांच्यासह संचालक दिपाली पाटील, सुनीता नागणे, संगीता सावजी, सुरेखा कलुबर्मे, पूजा शिंदे, वेणूबाई रोकडे, विद्या जावीर, कल्पना गडदे, मनीषा कुंभार आदी उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष शोभा काळुंगे म्हणाल्या की तालुक्याच्या आर्थिक व कौटुंबिक विकासात धनश्री परिवाराने योगदान दिले आहे. वाटप केलेल्या कर्जाची वसुली कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यामुळे कर्जाची वसुली देखील चांगल्या पद्धतीने झाली. भविष्यात देखील अनेक कुटुंबांना आधार देण्याची धनश्री परिवाराची भूमिका या पुढील काळात कायम ठेवून ठेवीदार, कर्जदार, यांचा विश्वास कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला. शिवाय धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक शैक्षणिक उपक्रम भविष्यात देखील राबवणार असल्याचे सांगितले.