मंगळवेढ्यातून उध्दव ठाकरेच्या सभेसाठी 75 वाहनातून शिवसैनिक-दत्तात्रय भोसले

मंगळवेढा(प्रतिनिधी) सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मंगळवेढ्यातून 75 वाहनातून शिवसैनिक नेल्याची माहिती शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी दिली.
लोकसभा निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात आली आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली.या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित झाल्यानंतर शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत,, रामहरी जाधव, महादेव साखरे, गणेश कुराडे, हरी घुले, अंबादास येडवे, जुबेर सुतार, रफिक शेख, नवनाथ रोकडे, सलीम खतीब ,अमोल क्षिरसागर, रेवणसिद्ध बिराजदार, रोहित मुद्गुल ,सौरभ जाधव, बाळासाहेब थोरवत मधुकर साबळे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने नेण्यात आले. त्यामुळे मोदी यांच्या आरोपाला उद्धव ठाकरे काय ? प्रतिउत्तर देणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागून राहिली होती.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिंदे गटाचा त्यांनी खरपूस समाचार घेत लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान जे पाच वचन दिले होते त्याचे त्यांनी कौतुक केले.