मंगळवेढा(प्रतिनिधी) शिक्षणाबरोबर अर्थकारणात काळुंगे पती पत्नीने सहकारी संस्थाची उभारणी करून हजारोचे संसार उभा करण्याचे काम केल्याचे गौरवोउद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा येथे धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळा निमित आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंद होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, राजन पाटील, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवाडी, धनश्री च्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, अॅड. धनाजी साठे, विश्वनाथ चाकोते, महेश कोठे, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, सद्गुरू कारखान्याचे शेषराव अंकल,बी. बी. जाधव,विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,हभप जयवंत महाराज बोधले, माजी आ. रामहरी रुपनर, भगीरथ भालके, दादासाहेब साठे,गणेश पाटील, दिनकर मोरे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, गुरुसिद्ध म्हेत्रे,चेतन नरोटे,नागेश फाटे,उपस्थित होते, यावेळी खा. शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शिवाजीराव काळुंगे यांच्या जीवनावर आधारित “अर्थवेल” या ग्रंवाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना खा.पवार म्हणाले की, या परिसराला दुष्काळाची झळा कायम असताना देखील अतिशय खडतर परिस्थितीत शेती, पाणी,शिक्षण, सहकार आणि समाज उभारण्यासाठी पती-पत्नीने आपले आयुष्य झोकून देण्याची भूमिका पार पाडली.त्यातून अनेक संस्थाची उभारणी देखील केली असून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी देखील त्यांनी चोखपणे पार पाडली. शिवाजीराव काळुंगे यांनी प्रेम विवाह केल्याची चिंता सुशीलकुमार शिंदे यांना का ? असा सवाल उपस्थित केल्यानंतर उपस्थित जोरदार हसा उमटला. माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की,हाडाच्या शिक्षकी पेशातून काळुंगे परिवारांने एवढा मोठा आर्थिक संस्थेचा डोलारा उभा करताना नवा समाज घडविण्याचे काम केले.आर्थिक संस्था चांगल्या चालवून दाखवल्या.काळुंगे यांनी नेहमीच नव समाज निर्मितीसाठी प्रयत्न केला. त्यांची लोकांना एकत्र आणण्याची कला, वाचनाबद्दलची आवड, शिस्तबद्धता या कामामुळे ते नेहमीच माझे आवडते राहिले आहेत.
प्रास्ताविक राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे यांनी केले. सुत्रसंचालन इंद्रजित घुले व श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार गौरव समितीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी मानले
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.