पिक विम्यावरून शिवसेनेचा शेतकऱ्यासमवेत कृषी कार्यालयात ठिय्या

मंगळवेढा(प्रतिनिधी) प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत खरीप पिक विम्याची ओरिएंटल कंपनीने अद्याप जमा न केल्यामुळे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यासमवेत कृषी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधीला घेराव घालण्यात आला.यावेळी प्रा. येताळा भगत व विमा प्रतिनिधीत भरपाई वरून खडाजंगी झाली.     

          प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत गतवर्षी खरीप हंगामा तालुक्यातील 66 हजार शेतकऱ्यांनी 52 हजार हेक्टरवर बाजरी, तूर,मका,कांदा या पिकाचा विमा भरला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीने 8 मधील 5 सर्कलमध्ये ॲग्रीम रक्कम मंजूर करताना बोराळे मरवडे आणि भोसे या मंडल मधील शेतकरी वगळले. मंजूर पाच सर्कलमधील बाजरी व मका या पिकाला ऍग्रीम 25 टक्के दिले 75 टक्के ॲग्रीम देण्यास विमा कंपनीने हात वर केले तर ज्या शेतकऱ्याने तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांमधील काही शेतकरी वंचित ठेवले. तर दुष्काळी परिस्थितीमुळे पीक जळून गेलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीने फेटाळल्या. विमा कंपनीच्या शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने शेतकऱ्या समवेत कृषी कार्यालयात ठिय्या मांडत विमा प्रतिनिधीला दोन तास थांबवून ठेवले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत,शेतकरी संघटनेचे रामचंद्र सारवडे, जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, गणेश गावकरे, रेवणसिद्ध बिराजदार, लक्ष्मण निकम, महादेव साखरे, आदी सह तालुक्यातील 200 पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांची रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करून तक्रारीचे निरीक्षण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलन थांबवले

——

 तालुका दुष्काळ जाहीर असताना  विमा कंपनीने शेतकऱ्याला वगळून अन्याय केला. सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम तातडीने जमा करावी अन्यथा 20 ऑगस्ट पासून पुणे येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.

रामचंद्र सारवडे,शेतकरी संघटना

———

 विमा कंपनीच्या चुकीच्या निकषाने तालुक्यातील शेतकऱ्याला वंचित ठेवले. वंचित शेतकऱ्यांना विमा कंपनीने तातडीने न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यासमवेत धडक मोर्चा काढणार.

प्रा.येताळा भगत, तालुकाध्यक्ष शिवसेना उबाठा गट

——–

 तालुक्यातील कांदा व बाजरीचा विमा भरलेल्या 33 हजार शेतकऱ्यांना सरसकट विमा 7 कोटी 31 रक्कम जमा होणार आहे. ती रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत जमा होईल.                                                           गणेश श्रीखंडे तालुका कृषी अधिकारी

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.