शिवसेना मंगळवेढा शहरप्रमुखपदी गणेश कुराडे
मंगळवेढा(प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरप्रमुखपदी गणेश शिवाजी कुराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. सदर निवडची वार्ता कळताच गणेश कुराडे मित्रपरिवार यांनी श्री संत दामाजी चौकात फटाकेची आतषबाजी करत जल्लोष केला.श्री संत दामाजी पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. मंगळवेढा शिवसेना शहरपदी निवड बद्दल नगरसेवक पांडुरंग नायकवाडी यांनी सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी अध्यक्ष नारायण गोवे,मी वडार महाराष्ट्राचा तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार,रमेश जाधव,सचिन शिंदे,गणेश कोळी,प्रतिक होडगे,भैय्या मुदगुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेश कुराडे बोलताना म्हणाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार येणाऱ्या काळात पक्ष मजबुती बरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेचे निवडणूक पुर्ण ताकतीने लढु. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याप्रमाणेच आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख गणेश दादा वानकर,तालुक्यातील आजी माजी शिवसेनेचे कट्टर पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून ज्या विश्वासाने मला ही जबाबदारी दिली ते सार्थकी ठरवू.