पंढरपूरमहाराष्ट्रराजकियसोलापूर

छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी व खा.सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेनेकडुन निषेध!

मंगळवेढा(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी व भाजपाचे खा.सुधांशु त्रिवेदी यांच्या या वक्तव्याचा शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख गणेश वानकर युवासेना जिल्हा अधिकारी महेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.22/11/2022 रोजी सकाळी 11 वा.दामाजी चौक येथे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने जोडोमारो आंदोलन व निषेध करत नायब तहसीलदार सुधाकर धांईजे यांना निवेदन देण्यात आले. या वक्तव्याची गंभीरपणे दखल घेऊन संबंधितवर कडक कारवाई करण्यात यावी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावे व भाजपाचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांना बडतर्फ करण्यात यावे.याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा अन्था शिवसेना रस्त्यावर उतरुन तिव्र असे आंदोलन करण्यात येईल व याकामी होणाऱ्या परीणामाची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील यांची नोंद घ्यावे असे कडक इशारा नुतन शहरध्यक्ष गणेश कुराडे यांनी दिले. यावेळी जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने,तालुका प्रमुख तुकाराम कुदळे,शहर समन्वयक नारायण गोवे,युवासेना प्रमुख दिपक कसगावडे,शंकर भगरे,शैलेश गोवे,विक्रम शेंबडे,दिपक वागज,भैय्या हजारे,रवि चेळेकर,बंडु बोडके संदेश कोळी,सोहेल इनामदार,अमोल राजमाने,अजय नाईकवाडी,महेश मोरे. बंडु टेकाळे, सागर वाघमारे,अक्षय कोळी, विनायक माने, अक्षय नागणे, उदय गायकवाड बळीराम कोडगर, समाधान बाबर, शिवाजी खंकाळ,शुभम माने सचिन देडे, हनमंत साळुंखे,वैभव कोळी,प्रदीप घुले, भागवत कोडगर, नागेश डांगे,सलमान बेग,अक्षय मुदगुल, अथर्व शिरसट आदी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close