मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील, यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे.पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा तालुक्यात या वाढदिवसाची धूम पहावयास मिळणार आहे.
उद्योजक ते राजकारणी आणि राजकारणी ते नेता असा प्रवास करत, सोलापूर जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवणारा नेता म्हणजे अभिजीत पाटील साखर कारखानदारीत वर्चस्व निर्माण न करून विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याशी जवळीक साधून त्यांचे नाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटले. अशा या २ राजकीय नेत्याचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचे मैदान,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर याशिवाय डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अभिजीत पाटील यांच्या वाढदिवस साजरा एक नव्हे तर तीन तालुक्यात होत आहे.पंढरपूर सह मंगळवेढा आणि माढा या दोन तालुक्यात वाढदिवस साजरा होणार आहे. अभिजीत आबा पाटील हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर व्यस्त आहेत. सकाळी नऊ वाजता पंढरपूर येथील संत नामदेव पायरी येथे त्यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. साडेनऊ वाजता ते ने टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी न महाराज चौक येथे उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता माढा तालुक्यातील अरण येथील श्री संत सावता माळी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. सकाळी ११ वाजता माढा येथील माढेश्वरी देवीचे दर्शन घेणार आहेत. दुपारी दोन वाजता ते परत पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उपस्थित राहून कै.आ. औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.
दुपारी चार वाजता ते मंगळवेढा येथील श्री संत दामाजी,जय भवानी देवी,संत चोखामेळा समाधीचे दर्शन घेऊन, गैबीसाहेब दर्यात अभिवादन करणार आहेत. यानंतर सायंकाळी सात वाजता, पुन्हा पंढरपूर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.