मंगळवेढा(प्रतिनिधी)धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी व धनश्री मल्टीस्टेटच्या तपपूर्ती सोहळा, संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 ते 19 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
बुधवारी स.10 वा सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. दु.2 वा.धनश्री महिला पतसंस्था रोप्य महोत्सवा निमित्त आजी माजी संचालकाचा सत्कार व तालुक्यातील 21 महिला पतसंस्थेच्या अध्यक्षांचा सत्कार, गरजूंना सायकल भेट देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जयमाला गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी कुणाल मचाले यांचा आपली संस्कृती हा मराठमोळ्या संस्कृतीचा नृत्यगीत अविष्कार सादर करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन दीपक साळुंखे यांच्या हस्ते होणार आहेत. गुरुवारी स.9.30 वा. संत परंपरेतील कीर्तनकार व प्रवचनकारांचा गौरव होणार असून यावेळी संत विचार आणि आजचा समाज या विषयावर ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. चैतन्य महाराज वासकर, ह.भ. प. निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प डॉ. गुरु जयवंत बोधले महाराज यांचा यामध्ये सहभाग असून याचे उद्घाटन प्रा. आप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते होणार आहे दु.2 वा. वाजता धनश्री महिला पतसंस्थेच्या रोप्य महोत्सव व मल्टीस्टेटच्या तपपुर्ती सोहळ्याचे निमित्ताने आजी-माजी संचालकाचा सत्कार व शिलाई मशीन वाटप, स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून रोपे महोत्सव निमित्त चांदीचे भेट अनावरण आरोग्य मंत्री तानाजी सावंत,हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. संध्या 7 वा. धनश्री व सिताराम परिवार आयोजित उषा मंगेशकर यांचा संगीत रजनी हा मराठी हिंदी गीताचा लाईव्ह कार्यक्रमात उषा मंगेशकर, कविता पौडवाल, अनुष्का शिकतोडे, मोहम्मद आयाज या गायकाचा यामध्ये समावेश आहे. त्याचे उद्घाटन कल्याणराव काळे यांच्या हस्ते होणार आहे म.शुक्रवार स.9 वाजता शेतीतील सर्वोत्कृष्ट उत्पादन पिकाचे प्रदर्शन मंगळवेढा शिवार वैभव चे सादरीकरण करण्यात येणार आहे त्याचे उद्घाटन वसंत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. स. दहा वाजता तरुणाईचा भारत या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे पत्रकार संजय आवटे, पत्रकार विजय चोरमारे यांचा सहभाग आहे याचे उद्घाटन बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.सायं 4 वाजता प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभा काळुंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार सोहळ्याचे व ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व साखर कारखान्याचे अध्यक्षाची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान धनश्री मल्टीस्टेटच्या पाटकळ, मार्केट यार्ड, शरद नगर या शाखा चे उद्घाटन देखील होणार असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.