पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसोलापूर

शाहू परिवार ठामपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी-अभिजित ढोबळे

सोलापूर(प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वात भारताची मान उंचावली आहे. त्यांच्या नेतृत्वातच भारत वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे संपूर्ण शाहू परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले सूत गिरणीचे अध्यक्ष आणि शाहू शिक्षण संस्थेचे सचिव अभिजित ढोबळे यांनी केले.

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू परिवाराचा मेळावा शुक्रवारी वाघोली येथील महात्मा फुले सूतगिरणी येथे झाला. यावेळी महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे सरचिटणीस शशिकांत चव्हाण, सरचिटणीस विकास वाघमारे, पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड उपस्थित होते.

अध्यक्ष अभिजीत ढोबळे म्हणाले, आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात मोठा विकास केला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आणून सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर केले आहे. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भरघोस मतांनी दिल्लीला पाठविल्यास सोलापूर जिल्ह्यातील विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे महात्मा फुले सुत गिरणीच्या सर्व सभासदांनी तसेच शाहू परिवाराच्या सर्व सदस्यांनी आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहनही अभिजीत ढोबळे यांनी केले. अध्यक्ष अभिजीत ढोबळे यांच्या आवाहनाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

 

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड, रवी वाघमोडे, संतोष दामोदरे, गणेश भोसले, रामचंद्र पतंगे आदी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close