मंगळवेढा (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक धोरणात ज्ञानेश्वरी पासून सर्व संत वाणीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी राज्याचे माजी उच्चशिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संतांच्या अलौकिक प्रतिभेने सर्वत्र भक्ती रसाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. चोखोबा पासून ते तुकोबापर्यंतच्या संतवाणीचे संस्कार किशोर वयात घडावेत यासाठी प्राथमिक विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षणाचे अभ्यासक्रमांमध्ये संतवाणीचा समावेश करावा यासाठी शिक्षण विभागाच्या सचिवांकडे आयुक्तांनी शिफारस करावी, अशी मागणी प्रा. ढोबळे यांनी आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संतांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्य निर्माण करून सामाजिक बदल घडविले आहेत.
Related Articles
Check Also
Close