मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री संत दामाजी साखर कारखाना ते सोलापूर नॅशनल हायवे रोडकडे जाणारा तसेच कारखाना ते ब्रम्हपुरी जुना पंढरपूर रस्ता या रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाल्यामुळे कारखान्याकडे ऊस घेवून येणारी वाहने,बैलगाडया खराब रस्त्यामुळे यांचा रस्त्यात घोटाळा होवून त्यांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याने हे खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी पुढे येत आहे.
सोलापूर नॅशनल हाय वे कारखाना पाटील ते कारखान्यापर्यंतचा रस्ता जिल्हा परिषदेकडे असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे ऊ साने भरून येणारी वाहने पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी जागोजागी पडलेल्या खड्डयामुळे वाहनांचे पाटे व अॅक्सल तुटत असल्याने आदी वाहने,बैलगाडया रस्त्याच्या मध्येच त्यांना थांबावे लागत असल्यामुळे शेतकर्यांचा ऊस कालांतराने वाळण्याचा प्रकारही यामधून घडत आहे.अशा घटनांमुळे शेतकर्यांना वाहनचालकांना दोघांनाही आर्थिक फटका बसत आहे.
ब्रम्हपुरी ते कारखान्याकडे जाणारा जुना पंढरपूर रस्ता हा जवळचा मार्ग म्हणून पुर्वीपासून ओळखला जातो. काही वर्षापुर्वी या मार्गावरूनच पंढरपूरकडे बैलगाडीच्या माध्यमातून शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेत असे.सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणात बागायत क्षेत्र वाढले आहे.या रस्त्याची अवस्था अत्यंत शोचनीय झाल्याने या भागातील ऊस कारखान्यापयर्ंत कसा आणायचा असा शेतकर्यांपुढे गहन प्रश्न उभा आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.