मंगळवेढा(प्रतिनिधी) रद्द झालेले रेशनिंग कार्ड धारकांची कार्ड पुर्ववत करून त्यांना रेशनिंग माल मिळावा याकरता भाजप युवा मोर्चा कडून राज्याचे महसूल तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे .
सध्या पूर्ण जिल्हाभरामधील रेशनिंग कार्ड धारकांची कार्ड कागदपत्रे अभावी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . पण याआधी देखील कार्ड धारकांनी कागदपत्रांची पूर्णता केली आहे तरी देखील कार्ड रद्द झालेले आहेत . ज्यांची कागदपत्रे अपुरी आहेत ते पूर्ण करण्या करता 45 दिवस कालावधी जात आहे . तसेच ऑनलाइन पद्धत असल्याने सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण आहे . या पद्धतीमुळे सध्या अंत्योदय कार्ड धारकांना माल मिळत नाही . ज्यांचे कागदपत्रे पूर्ण आहेत दिले आहेत त्यांना 45 दिवस कालावधी न लावता तात्काळ माल देण्यात यावा . असे निवेदन देण्यात आले .
सदरील निवेदनावर पालकमंत्री विखे पाटील यांनी तहसीलदार यांना तात्काळ लक्ष घालून सदरील प्रकार तपासण्यास सांगितले आहे . सदरील निवेदन देताना भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण ,भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सुदर्शन यादव , किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नागेश डोंगरे ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांबळे ,कपिल हजारे,शहराध्यक्ष सुशांत हजारे , शहर सरचिटणीस अजित लेंडवे , शहर उपाध्यक्ष सचिन हेंबाडे आदी उपस्थित होते .