प्रलंबित चारा छावणी बिलासंदर्भात आ.आवताडे यांची मंत्री ना.अनिल पाटील यांच्या समवेत छावणी चालकांची बैठक संपन्न!

मंगळवेढा (प्रतिनिधी) : सन २०१८-१९ मध्ये मंगळवेढा तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या ६० चारा छावणी चालकांचे जवळपास १२ कोटी रुपये बीले शासनाकडे आज ही प्रलंबित आहेत ते लवकर मिळावे यासाठी चारा छावणी चालकांसमवेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट घेऊन सदर छावणी चालकांचे बिल लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचुंबना होत आहे. छावणी चालकांच्या या मागणीवर आ.अवताडे यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून तसेच विधानसभा सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये चारा छावणी चालकांची रखडलेली बिले मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यात असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून अदा करण्यात यावीत असे आ.आवताडे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

त्या सर्व चारा छावण्या चालकांकडून व्यवस्थितपणे चालवण्यात ही आल्या होत्या. पण तालुक्यातील चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाकडे आज ही प्रलंबित आहे, यासंदर्भात चाराछावणी चालकांसमवेत आमदार आवताडे यांनी मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत चर्चा केली व तात्काळ प्रलंबित अनुदान/बीले मंजूर करावीत याकरिता निवेदन दिले. तसेच यावेळी मतदारसंघातील विकासात्मक बाबींच्या इतर महत्त्वाच्या विषयांवर देखील आमदार आवताडे यांनी मंत्री ना. पाटील यांच्यासमवेत छावणी चालकांच्या उपस्थितीमध्ये चर्चा केली.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.