Uncategorizedक्राइमसोलापूर

पुण्यानंतर सोलापुरात भाजप आमदारावर शाई फेकण्याचा प्रयत्न!

सोलापूर(प्रतिनिधी)भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेकल्याची घटना घडली. पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी काही अज्ञातांनी त्यांच्यावर शाई फेकली होती.हे प्रकरण ताजे असताना भाजपच्या आणखी एका आमदारावर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोलापूरमध्ये ही घटना घडली.

सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख काल एका विवाह सोहळ्यासाठी गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाई फेकीसाठी आलेल्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. भीम आर्मीचे हे कार्यकर्ते असल्याचे देखील समोर आले आहे. देशमुख यांच्यावर शाई फेकीचा प्रयत्न होताच कार्यक्रमामध्ये एकच गोंधळ उडाला.

भाजप नेत्यावर शाईफेकीचा हा दुसरा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. आधीच राज्याचे वातावरण आक्षेपार्ह विधानांमुळे ढवळून निघालेले आहे. त्यात सीमावादासारखे प्रश्न देखील तोंड वर काढू लागले आहेत. अशात एका पक्षावर शाई फेकीच्या घटना घडल्याने राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक झाल्यानंतर संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close