मंगळवेढा(प्रतिनिधी) येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात अक्षतावाटप करण्यात आले. ओ.बी.सी चे सोलापूर जिल्हाध्याक्ष विवेक खिलारे यांनी आपल्या भागातील प्रत्येक वाडी-वसत्यावर जाऊन अक्षतावाटप सुरू केले आहे. प्रभु राम प्राणप्रतिष्ठा दिवशी डोंगरगाव येथे प्रभू रामाच्या दिंडीने सुरुवात होऊन दिवस भर विविध सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर महाप्रसादचे ही नियोजन करण्यात आले आहे. यावेळी अमोल मेटकरी, संगम खडतरे. उत्तम सावंत, विकास तोडकरी, दादा खिलारे, दादा पाटील,सतीश उत्तम भुसे, नामदेव लटके, तुकाराम मिटकरी.राजू माळी, मल्हारी माळी, सिद्धेश्वर बाबर, दरीबा मेटकरी , अमर लटके, अमोल लटके ज्योतीराम शिरसागर, श्रेयस पाटील, दत्ता भुसे, आदी उपस्थित होते.
Check Also
Close