राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच हुतात्मादिन या निमित्ताने प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून जनसेवा शिक्षण व समाजसेवा मंडळ संस्थेच्या संचालिका प्रा.विनयाताई ताम्हणकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्तृत्वान डॉ.सतीश अच्युतराव डोके, डॉ.अश्विनी सतीश डोके आणि कामसिद्ध विद्यालय खुपसंगी चे सहशिक्षक राजेंद्र हरिभाऊ माळी उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल संस्था आणि प्रशालेच्या वतीने श्री राजेंद्र माळी सर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र माळी यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. डॉ.अश्विन डोके यांनी विदयार्थ्यांना आहार, विहार, अभ्यास, खेळ आणि छंद या पाच गोष्टी विषयी सविस्तर माहिती दिली. प्रशालेचे सहशिक्षक शिवाजी कोंडुभैरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल लहान लहान गोष्टी सांगितल्या. हुतात्मा दिनाबद्दल माहिती दिली.
सदर कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून कार्यक्रम खालील विद्यार्थ्यांनी सादर केले.इयत्ता चौथी मधील सई पवार, श्रुती केदार, अनुराग टाकळे, शिवश्री चव्हाण, दिशा जगताप, पृथ्वीराज शेणवे, आर्या नकाते, अमृता गरड, समृद्धी घोडके, रोहन हेंबाडे. इयत्ता तिसरी मधील मनवा खांडेकर, भक्ती बिराजदार, शुभ्रा येडसे, शुभ्रा गावंदरे, श्रेया जाधव, संस्कृती नाईकवाडी, प्रगती स्वामी यांनी जिजाऊ वंदना सादर केली. तसेच आदित्य गडदे यांनी स्वामी विवेकानंद बद्दलचे भाषण केले. प्रणिती शिंदे यांनी जिजाऊ गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा.विनयाताई ताम्हणकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रेरक प्रसंग सांगून मार्गदर्शन केले. त्यामुळे सर्व विद्यार्थी खूप प्रभावीत झाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा कुलकर्णी, अध्यक्षीय सूचना स्वप्ना बोबडे, अनुमोदन सुजाता स्वामी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय सचिन घोडके, आभार प्रदर्शन अर्चना यादव सूत्रसंचालन सिद्धेश्वर पवार यांनी केले.फलक लेखन प्रकाश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.