पंढरपूरमंगळवेढासोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य पदी सुदर्शन यादव यांची राज्यपाल नियुक्त निवड


मंगळवेढा(प्रतिनिधी)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा ( सिनेट ) सदस्य पदी मंगळवेढ्याचे सुदर्शन यादव यांची निवड करण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या अधिपत्याखाली ही निवड करण्यात आली. अभाविपच्या कार्याला सुरवात करून विविध जवाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या आहेत . सोलापूर जिल्हा सहसंयोजक , सोलापूर जिल्हा संयोजक , नांदेड महानगरमंत्री , महाराष्ट्र कार्यसमिती सदस्य , महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य , दोन वेळा महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री तसेच पूर्ण वेळ प्रचारक संघटनमंत्री म्हणून देखील काम केले.फी वाढीसाठीचे गनिमी कावा आंदोलन तर समाजकल्याण नांदेड येथे तमाशा आंदोलन गाजलं.नांदेड येथे 2 वर्षे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अनेक वेळा तर निकालाबाबत हालगीनाद आंदोलन,.अहमदनगर येथे 1 वर्ष काम केले असून पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर उपकेंद्र येथे b com विद्यार्थ्यांसाठी घेराव आंदोलन मोठे केले. यादव यांच्या निवडीबद्दल आ.समाधान आवताडे,आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष मा.आ.नरेंद्र पाटील,शशिकांत चव्हाण सोलापूर जिल्हा युवा मोर्चा तील अनेक पदाधिकां-यानी आदीने अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close