मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा येथील प्रा. डॉ. मंगेश मोहन वेदपाठक व सुदर्शन मसु यादव यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लि. शाखा मंगळवेढा तर्फे सोलापूर जिल्हा प्राथमिक सहकारी सोसायटीचे संचालक श्री संजय चेळेकर यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे अधिपत्याखाली शास्त्रज्ञ विभागातून प्रा. डॉ. मंगेश मोहन वेदपाठक तर सामाजिक कार्य विभागातून सुदर्शन मसु यादव यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यपदी निवड करण्यात आली. यानिमित्त लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लि. शाखा मंगळवेढा तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी मंगळवेढा शाखेचे व्यवस्थापक अॅड शिवाजी दरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा
आढावा सादर केला.
या कार्यक्रमास मान्यवर सभासद ग्राहक व सर्व कर्मचारीआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण पवार,आश्विनी मेलगे सुलभा काकडे, सुनीता शिंदे, चंदशेखर चोपडे, सोमनाथ गायकवाड, यांनी परिश्रम घेतले.