मंगळवेढा-छत्रपती शिवाजी तरुण मंडळ शिवाजी तालीम वडार गल्ली,मंगळवेढा या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संतनगरी मंगळवेढा या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, महादेव लुगडे, गौडप्पा बिराजदार, औदुंबर वाडदेकर, माजी नगरसेवक अजित जगताप, प्रवीण खवतोडे, सोमनाथ माळी यांचेसह महादेव जाधव, विजय बुरकूल, रामचंद्र माने, बबलू सुतार,मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संताची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला मंगळवेढा परिचित आहे. हजारो वर्षापासून या शहराला एक भव्य, दिव्य, ऐतिहासिक परंपरा लाभली असून महाराष्ट्रतील अनेक संत सज्जनांचे सहवास या नगरीला लाभले आहेत. ज्ञानेश्वरांच्या समकाल मंगळवेढ्यातील सर्व संतांचा स्थळांचा उध्दार व्हावा व महाराष्ट्रात मंगळेवढा मोठे तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास यावे. समाजात सर्व नागरीकांना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात अध्यात्मिक गोष्टींचा माहिती देण्याचा व लहान मुलांना त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी चांगला अध्यात्मिक संदेश देण्याचा छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने केला असून पुरातन मंगळवेढा कसा होता व मंगळवेढ्यामध्ये होऊन गेलेल्या संतांची माहिती देण्याचाही प्रयत्न या मंडळाने केल्याबद्दल परिचारक यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे यावेळी कौतुक केले.