मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या 13 विविध प्रश्नाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड राहुल घुले,जिल्हाध्यक्ष युवराज घुले,तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार,संतोष पुजारी,श्रीशैल हत्ताळी,निसार पाटील ,निलकंट साखरे,रामगोंडा पाटील ,आबा खांडेकर,हे उपस्थित होते,त्यामध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना तात्काळ सुरू करावे, राजकीय चालढकलीत अडकलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम सुरू करावे,खरीप हंगामात पिक विमा भरलेल्या सुमारे 68 हजार 78 शेतकऱ्यांना 25 % अग्रीम मिळावे,शेतकऱ्याकडील सर्व कर्जाची सक्तीने सुरू असलेल्या वसुलीला स्थगिती द्यावी,खरिपाच्या पीक कर्जाचे तात्काळ पुनर्गठन करून रब्बी हंगामासाठी नव्याने पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे,15 जून पासून बंद असलेली पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू करून चूक दुरुस्तीसाठी एक खिडकी योजना सुरू करावी,दुधाला विना कपात 34 रुपये दर देऊन 34 रुपये पेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संघावर कायदेशीर कारवाई करावी. पीक पाणी पूर्वीप्रमाणे गाव कामगार तलाठी यांनी शेताच्या बांधावर जाऊन करून घ्यावे,सर्व प्रकारच्या पशुखाद्याचे दर दोनशे रुपये कमी करावे,लंपी आजाराने मेलेल्या जनावराचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे,उजनी उजव्या कालव्याचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्र व माण नदीत सोडावे.चारा डेपो सुरू करून दुष्काळ पट्ट्यातील जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा.मनरेगातून विहीर व फळबाग कामे सुरू करावीत या मागण्यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.