ऐरोली सेक्टर ८ येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना जोडे मारा आंदोलन!
नवी मुंबई(प्रतिनिधी)भारत जोडो अभियान दरम्यान कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद नवी मुंबईतही पडले असून बाळासाहेबांची शिवसेना जिलाध्यक्ष विजय चौगुले यांनी जोडे मारो आंदोलन केले. कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर अवघ्या काही दिवसात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. या आपेपार्थ विधानाचा निषेध म्हणून ऐरोली सेक्टर ८ येथे शिवसेना कार्यालय समोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारीही उपस्थित होते. राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या विरोधात मोठ्या घोषणा देण्यात आल्या व राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. राज्यात येताच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आक्षेपार्थ बोलले.वास्तविक त्यांना मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने सवंग लोकप्रियतेसाठी व चर्चेत राहण्यासाठी ज्यांची महानता स्वतः इंदिरा गांधी यांनी मान्य केली अशा सावरकर विषयी राहुल गांधी यांनी आक्षेपार्थ विधान केल्याचा निषेध आम्ही केला यावेळी केवळ शिवसैनिकच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही यात सहभाग घेतला होता अशी प्रतिक्रिया विजय चौगुले यांनी दिली.