मंगळवेढा(प्रतिनिधी) गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने इंटिग्रेटेड सोसन वेलफेअर सोसायटी चिकोडी बेळगावी व नॅशनल रुरल फोऊडेशन बेळगावी यांच्या तर्फे दिल्ली,कर्नाटक ,महाराष्ट्र, गुजरात,गोवा या राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो,प्रा,राजेश भोजने यांना साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्टीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, राष्टीय पातळीवरचा हा हा मानाचा पुरस्कार आहे,रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एजुकेशन हरमल गोवा ( श्री,लक्ष्मीकांत पार्सेकर माजी,मुख्यमंत्री गोवा,यांचे कॉलेज ) याठिकाणी जिल्याचे पोलीस प्रमुख ,एस, पी,मंत्री मोहदय,खासदार,आमदार,अधिकारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, या पुरस्काराचे राष्टीय गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह ,सन्मान पत्र व माजी केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र,म्हैसूर फेटा,चंदनाचा कायम स्वरूपी हार असे स्वरूप असणार आहे. राजेश भोजने यांची स्वप्न वाटा ( २६५ पानी ) व चंदेरी तारे ( ९० पानी ) पुस्तके प्रकाशित करण्यास तयार आहेत, तसेच दैनिक दामाजी एक्सप्रेस व स्वाभिमानी छावा या दैनिकातुन २५० च्या वर स्थभलेख प्रसिद्ध आहेत ,त्यानी भटकंती,भ्रमंती,चंदेरी तारे व आम्ही सीमावर्ती ही सदरे प्रसिद्ध आहेत,राजेश भोजने हे विजय विठ्ठल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सोन्याळ ता, जत, याठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते नंदुर ता, मंगळवेढा जि, सोलापूर येथील रहिवासी आहेत,त्याना यापूर्वी मुबई येथील आदर्श गुरुजन पुरस्कार ,लायन्स क्लब जत यांचा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांचा नवउन्मेष साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे,
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.