प्रियदर्शनी महाडिक यांना डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी पवन महाडिक यांना ड्रीम फॉउंडेशन,डॉ. कलाम मिशन, बसवसंगम शेतकरी गट व चाणक्य गुरुकुल आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेल्या या पुरस्कार वितरण समारंभामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक मा.खासदार अमर साबळे तसेच प्रमुख मार्गदर्शक सोलापूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मा.नितीन धार्मिक,सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड,ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी,कार्यक्रमाचे समन्वयक कल्लप्पा भतगुणकी,संगीता भतगुणकी इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी पवन महाडिक यांना डॉ.कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रियदर्शनी महाडिक यांनी आपल्या मनोगतातून दलितमित्र स्व.कदम गुरुजी यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून समाजातील सर्व घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने सुरू केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ , मंगळवेढा या संस्थेच्या विविध शाखांचा प्रगतीचा आलेख कसा चढता आहे हे थोडक्यात सांगितले तसेच भविष्यात मंगळवेढ्याच्या विकासामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग एक टर्निंग पॉईंट ठरेल असे त्या शेवटी म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्यासाठी इंग्लिश स्कूल,मंगळवेढा प्रशालेतील जेष्ठ शिक्षिका उर्मिला राऊत,संध्या राक्षे,रतन क्षीरसागर,तसेच प्रशालेतील शिक्षक महादेव फुलारी,निलेश हजारे,रोहित शिंदे,निवृत्तीनाथ शिवशरण व अजय घाडगे उपस्थित होते.
सचिवा प्रियदर्शनी महाडिक यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,अकॅडमी ऍडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, संचालिका व शिवशंभो पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले ,खजिनदार राम नेहरवे, संचालिका अजिता भोसले, संचालक यतीराज वाकळे, संचालक अमीरहमजा भालदार,संचालक ॲड.शिवाजी पाटील तसेच इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज मंगळवेढा या प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशीद,उपमुख्याध्यापक सुनिल नागणे, पर्यवेक्षक राजू काझी,दिलीप चंदनशिवे,सुहास माने तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.