पंढरपूरमंगळवेढासामाजिक

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी संपादन केलेल्या नुतन सरपंच व सदस्यांचा सत्कार आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न!

मंगळवेढा(प्रतिनीधी)-तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गट व समविचारी आघाडी एकञित येत १८ ग्रामपंचायती पैकी ११ ग्रामपंचायतीमध्ये परिचारक गट व समविचारी आघाडीच्या नुतन सरपंच व सदस्यांचा सत्कार युटोपीयन शुगर लि.पंतनगर येथे माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करणेत आला. यावेळी दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुसभाई शेख,दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर,पं.स.माजी उपसभापती काशिनाथ पाटील,न.पा.पक्षनेते अजित जगताप,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ,भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,दामाजी शुगरचे संचालक बसवराज पाटील,दामाजी शुगरचे माजी संचालक भारत पाटील,दामाजी शुगरचे संचालक महादेव लुगडे,रेवणसिध्द लिगाडे,दिगंबर भाकरे,तानाजी कांबळे,पंढरपूर मार्केट कमिटीचे उपसभापती संतोष घोडके,आ.प्रशांतराव परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार,गुलाब थोरबोले,माधवानंद आकळे,अरुण पाटील,पिंटु गवळी,हरी हिप्परकर,सुरेश पाटील,सतीश आवताडे,प्रकाश येलपले,दुशासन दुधाळ,मेघराज दोडके,श्रीकांत गणपाटील,शशिकांत सावंत,संतोष डांगे,विश्वास खुळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आ.प्रशांत परिचारक म्हणाले,शासनाचा लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीला भरपुर निधी मिळतो,त्यानुसार गावामध्ये पुढील पाच वर्षचा प्लॕन आराखडा राबवुन निधी खर्च करावयाची व गावामध्ये विवीध योजनेच्या माध्यमातुन निधी आणुन स्मार्ट गाव करण्याची जबाबदारी पॕनलप्रमुख व नुतन सरपंचाची आहे.योजना अनेक आहेत त्या आमलांत आणल्या पाहीजेत.गावाच्या विकासासाठी विवीध योजना निधी मिळवुन देण्यासाठी तसेच गावाच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाच्या माध्यमातुध सोडवु.गावातील प्रमुख नकाशावरील रस्ते असतील,पाणंद रस्ते,गावअंतर्गत रस्ते यासाठी विवीध योजनेतुन ग्रामपंचायतीला निधी मिळवुन देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहोत.
यावेळी गोणेवाडीचे नुतन सरपंच बाबासाहेब मासाळ,तळसंगीचे नुतन सरपंच प्रदिप पाटील,शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले,मारोळीचे सरपंच राजकुमार पाटील,येड्रावचे सरपंच संजय पाटील,हाजापुरचे सरपंच दादासो देवकुळे,पौटचे सरपंच महादेव हिप्परकर,भालेवाडीचे सरपंच श्रीकांत दवले,बावचीचे सरपंच राजु गाढवे,ढवळसचे सरपंच सुधाकर हेंबाडे,फटेवाडीचे सरपंच प्रकाश काळुंगे,सलगर खुर्दच्या सरपंच आरती अजय कांबळे व सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close