ब्रह्मपुरी येथील भीमा नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसावर पोलिसांची कारवाई!

मंगळवेढा(प्रतिनिधी)तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यावर पो.नि.रणजित माने यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत 17 ब्रास वाळू सह 5 लाख 77 हजाराचा ऐवज हस्तगत करून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची फिर्याद पोना ईश्वर सिध्दलींग दुधाळ यांनी दिली.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन उमाजी जाधव रा. घुमेरावाडा वेळापुर, आण्णा भीवा कोकरे रा.ब्रम्हपुरी, सुरेश चौगुले रा शांतीनगर मंगळवेढा,विजय जावळे रा धर्मगांव रोड मंगळवेढा,विजय माने रा.मळोली ता माळशीरस विशाल जाधव रा वेळापुर ता माळशिरस यांनी ब्रम्हपुरी येथील बठाण रोडवरील शेतजमीन गट नं 822/01 मध्ये वाळू साठा करून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने,सपोनि बापूसाहेब पिंगळे यांच्या पथकाने यावर आज या साठ्यावर धाड टाकून टाकली असता यामध्ये 17 ब्रास वाळू कि.1 लाख 2 हजार,3 लाख किमतीचा एक स्वराज्य 855 कंपनीचा ट्रॅक्टर क्र.MH24D 1059 ,1लाख 50 हजार किंमतीच्या दोन वाळु काढण्याचा कप्पी,25 हजाराची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसाईकल क्रमांक MH13 AG 3267 असा 5 लाख 77 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला.दोन दिवसापूर्वी तहसीलदार स्वप्निल रावडे यांची करवीर येथे बदली झाल्याचे वृत्त समजल्यानंतर नवीन तहसीलदारांनी पदभार घेण्यापूर्वी वाळूमाफीयाने डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क पोलीस यंत्रणेमुळे हा जोर हाणून पडला पोलिसांनी या वाळूमाफीयाच्या मुसक्या आळवत कारवाईची मोहीम तीव्र केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.