Uncategorizedपंढरपूरमंगळवेढासोलापूर

पाशाभाई पटेल यांनी मंगळवेढा शिवारातील करडई पिकाची केली पाहणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा तालुक्यातील काळ्या शिवारातील करडई व ज्वारी पिकाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी भारत दत्तु यांच्या करडई पिकाची पाहणी केली. यावेळी कृषिभूषण अंकुश पडवळे, सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे,प्रगतशील शेतकरी हरिभाऊ यादव,LIC विकास अधिकारी रणजित जगताप,अमरजित जगताप,पिंटू माने, लक्ष्मण हेबांडे,भारत दत्तु तसेच लोदग्याचे सरपंच पांडुरंग गोमरे सह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सामी रिसॉर्ट व क्बलाही भेट दिली. पाशाभाई पटेल यांनी नैसर्गिक पध्दतीने येणाऱ्या मंगळवेढा शिवारातील भारत दत्तु यांच्या करडई या कोरडवाहू पिकांची पाहणी केली. मंगळवेढा शिवाराला काळ्या कसदार जमीनीचे लाभलेले वैभव व त्यामुळे कोणतेही पाणी न देता येणारी पिके सेंद्रिय पध्दतीने येत आहेत.त्याला मार्केटिंगचा वेगळा ब्रँड बनविणेसाठी संपूर्ण मदत करणार असल्याचेही यावेळी पाशाभाई पटेल यांनी सांगितले. भारत दत्तु यांनी या पूर्वी तूर व करडई या कोरडवाहू पिकात विक्रमी उत्पादन घेऊन अनेक जिल्हास्तरीय बक्षिसे मिळवली आहेत. तसेच भारत दत्तु यांना ५० वर्षे पूर्ण झाले बद्दल पाशाभाई पटेल यांनी दत्तु यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close