माघी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

पंढरपूर(प्रतिनिधी)माघ वारी दरम्यान पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. यावर्षी माघ वारीत वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे ‘तीर्थक्षेत्र पोलीस: माघी वारी २०२३’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने व प्रशासनावर येणारा अधिकचा ताण कमी करण्याकरिता वारी काळात ‘स्वेरी’ नेहमीच कार्यरत असते. स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील २० प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० विद्यार्थ्यांनी दि.३१ जानेवारी २०२३ ते दि.२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत माघ वारी व्यवस्थापन कार्यात सहभागी होवून पोलीस प्रशासनाला अनमोल सहकार्य केले.
यावेळी ‘पोलीस मित्र’ म्हणून कार्य करत असताना स्वेरीचे विद्यार्थी पंढरपूर शहरात महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांचे नातेवाईक शोधण्यात मदत करत होते. तसेच गर्दी नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांचे समूह कार्य करत होते. शहरातील प्रमुख गजबजलेल्या ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट परिसर या महत्त्वाच्या परिसरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते वारकऱ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करत होते. स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा ताण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाला. स्वेरी स्थापनेपासून शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात देखील नित्य योगदान देत असते. स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी महत्वाच्या वारी काळात दर्शन रांगेतील वारकऱ्यांना पाणी वाटप, निर्मल वारी, पोलीस मित्र, स्वच्छता मोहीम, औषध वाटप, आरोग्य तपासणी पथनाट्याद्वारे जनजागृती अशा विविध उपक्रमांतून सामाजिक योगदान देत आहेत. यामुळे स्वेरीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांच्या नेतृत्वाखाली, बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती यांच्या सहकार्याने स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी या सेवेत सहभागी झाले होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.