मंगळवेढा(प्रतिनिधी) पांडुरंग परिवार भक्कमपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभा आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची कार्यकर्ता विचार विनिमय बैठक मंगळवारी उत्साहात झाली.
पांडुरंग परिवारातर्फे आमदार राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, संपूर्ण पांडुरंग परिवार भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासोबत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे. गेल्या १० वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा अशा अनेक बाबतीत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. गावागावांत अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. आपल्या सोलापूरच्या सर्वागीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम पर्याय आहेत. त्यामुळे देशभराचे सर्वमान्य नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिलेदाराला राम सातपुते यांना मोठ्या संख्येने विजयी करा, असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी याप्रसंगी केले.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातर्फे सोलापूर जिल्ह्यातून एक कमळ दिल्लीला पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.
भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मी सदैव प्रयत्नशील असणार आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच सोलापूरच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्यावे, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले.
यावेळी चेअरमन शिवानंद पाटील, बाबासाहेब पाटील, रामकृष्ण नागणे,गौरीशंकर बुरकुल,औदुंबर वाडदेकर,राजेंद्र पाटील,डॉ. शरद शिर्के,नंदकुमार हावनाळे,सुरेश जोशी, काशिनाथ पाटील, भारत पाटील, सुधीर करंदीकर, शिवाजी घोडके, जगन्नाथ कोकरे, नामदेव जानकर, रामभाऊ माळी, भुजंगराव आसबे,तम्मा जगदाळे, हरिभाऊ यादव, बाळासाहेब यादव, गोपाळ भगरे, महादेव लुगडे, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, रेवणसिंहर लिगाडे, तानाजी कांबळे, अशोक माळी, राजाराम कोळी, उत्तम घोडके, पप्पू स्वामी, विष्णू मासाळ, बबलू सुतार, राजू पाटील,पिटू शिंदे, विठ्ठल बिराजदार, सचिन चौगुले, अर्जुन शिरोळे, प्रा. डी. वाय. पाटील, दत्ता नागणे, श्रीकांत साळे, बिरूदेव घोगरे, मधवानंद आकळे, भारत लेंडवे, श्रीकांत गणपाटील, सिद्धेश्वर मेटकरी, भागवत माळी, भागवत भुसे, सिद्धेश्वर पाटील, बाळासाहेब चौगुले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.