पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसे गौरवने सन्मानित!

वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा मानस!

पंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीपबापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधीज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतचा राजकीय प्रवासाला उजाळा देत वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास दिला.

यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञांचा शाल, फेटा आणि पैठणी साडी देऊन सपत्नीक सन्मान केला.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर आधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर येथे करण्यात आले होते.

यावेळी पंढरपूर आधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले, उपाध्यक्ष महेश कसबे, सचिव अभयसिंह देशमुख, मंगळवेढा आधिवक्ता संघाचे अध्यक्ष उल्हास माने,सदस्य निकिता अवताडे,संदीप रणनवरे, पराग जहागीरदार,विजयकुमार नागटीळक, समाधान गायकवाड, विलास साळुंखे, गणेश चव्हाण,कीर्तिपाल सर्वगोड,रेखा यादव यांच्यासह मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, महेश पवार, नानासाहेब कदम,पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.