मंगळवेढा -येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकापूर्वी मंगळवेढा -शिरनांदगी रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकू असा इशारा डोंगरगाव, हाजापूर, जालीहाळ, सिद्धकेरी, रड्डे, शिरनांदगी, खोमनाळ, पाटखळ, आंधळगाव व खडकी या दहा गावच्या गावाकऱ्यांनी दिला आहे.
मंगळवेढा -शिरनांदगी, डोंगरगाव -पाटखळ, डोंगरगाव -आंधळगाव, डोंगरगाव -खोमनाळ हे रस्ते अत्यंत खराब व अर्धवट अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. या रस्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा म्हणून या दहा गावच्या ग्रामस्थांनी शुक्रवार मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले त्याप्रसंगी हा इशारा दिला आहे.
यावेळी जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता कोष्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशोक मुलगीर, यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या 15 दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे, अॕड.रविकिरण कोळेकर (रड्डे )माधवानंद आकळे (हाजापूर )भीमराव मोरे (पाटखळ )डी. के. साखरे,भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले,शिवसेना महिलाध्यक्ष क्रांती इंगोले,डोंगरगाव लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे, माजी सरपंच मंगल मेटकरी, वैशाली चंदनशिवे,यांचेसह भागातील नागरिक सहभागी होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.