मंगळवेढा(प्रतिनिधी)येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1 ते 4 मे दरम्यान मंगळवेढा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड सुजित कदम यांनी
इंग्लिश स्कूलच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 1 मे रोजी दुपारी 4 वा. स्व. कदम गुरुजी व स्वर्गीय ताड आप्पा यांच्या प्रतिमेची मिरवणूक मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या उपस्थितीत व शिवाजीराव पवार यांच्या शुभहस्ते निघणार आहे, 2 मे रोजी स.8 वा. कृषी क्रीडा ज्योत दौड व सायकल रॅलीचे कदम गुरूजी स्मारक ते ताड मळा दरम्यान आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन अॅड नंदकुमार पवार यांच्या हस्ते अजित जगताप उपस्थितीत होणार आहे. स.10 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन अवताडे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय आवताडे यांच्या हस्ते डॉक्टर शरद शिर्के व डॉक्टर प्रिती शिर्के यांच्या उपस्थित होणार आहे सायं.6 वाजता सुरसंगम प्रस्तुत मराठी हिंदी गीताचा कराओके शो चे उद्घाटन खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते होणार असून यावेळी पवन महाडिक व डॉ. नितीन तोष्णीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.3 मे रोजी स.9 वाजता मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते अल्पसंख्यांक सेलचे लतीफ तांबोळी, व डॉ.पद्माकर अहिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायं.6 वाजता महाराष्ट्राच्या लोकधारा या कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या हस्ते व पो. नि. रणजित माने व डॉ. विजय मोरे यांच्या हस्ते होणार आहे. 4 मे रोजी स. 9 वा. भजन आयोजित करण्यात आले.तर 12 वाजता भिमाचे अध्यक्ष विश्वराज महाडिक व कुलगुरू एस.के. पवार यांच्या उपस्थित पुष्पवृष्टी होणार आहे.दुपारी 12.15 वा.केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजक मेळावा व महोत्सव समारोप होणार आहे अध्यक्षांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे असणार आहेत यावेळी आ.समाधान आवताडे,आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. शहाजी बापू पाटील,आ. राजेंद्र राऊत,माजी आमदार प्रशांत परिचारक,प्र.कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रा. शिवाजीराव सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास लाभ घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,सचिव प्रियदर्शनी कदम- महाडिक, संचालिका डॉ. मीनाताई कदम,तेजस्विनी कदम, श्रीधर भोसले,राम नेहरवे, अजिता भोसले, शिवाजी पाटील, अमीर हमजा भालदार,यतिराज वाकळे यांनी केले. संस्थेच्या विविध शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.