पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

रोहन परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स येथे जिल्हास्तरीय पुरुष खो –खो स्पर्धेचे आयोजन.

मंगळवेढा (प्रतींनिधी) युटोपियन शुगर्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स लि. येथे जिल्हास्तरीय खुल्या पुरुष गट खो–खो स्पर्धेचे दिनांक २४ मे २०२३ रोजी आयोजन केले असल्याचे माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सदरच्या स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू करण्यात येणार असून तत्पूर्वी संघाने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास रु. १५१११/- द्वितीय संघास रु. १११११/- तृत्तीय संघास रु. ७१११/- चतुर्थ संघास रु ४१११/- देण्यात येणार असून उत्कृष्ठ संरक्षक रु. ५११/-, उत्कृष्ठ आक्रमक ५११/-तसेच उत्कृष्ठ खेळाडू ५११/-अशी वैयक्तिक पारितोषिके ही देण्यात येणार आहेत.

सदरच्या स्पर्धा या सोलापूर अॅम्युचर खो-खो- असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आल्या असून नाव नोंदणी व इतर माहिती करीता लक्ष्मण पांढरे मोबाईल क्रमांक ७७२०० ६८६७४ व सुनील पुजारी मोबाईल क्रमांक ९७६४९ २०७९८ या क्रमांकावरती संपर्क साधावा व  जास्तीत जास्त संघाने सहभागी व्हावे असे आवाहन ही कारखाना प्रशासनाने केले आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close