पंढरपूर(प्रतिनिधी) गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक) मध्ये येत्या बुधवारी व गुरुवारी अर्थात दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडंटस स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून इंटर झोनल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.
स्वेरीच्या मैदानावर होत असलेल्या या क्रीडा स्पर्धेत बुधवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ व बॅडमिंटन तर गुरुवार, दि. १० नोव्हेंबर रोजी कॅरम व टेबल टेनिस या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदविका महाविद्यालयातील विद्यार्थी-खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमाचे क्रीडा शिक्षक प्रा. एस.एस. निकम यांच्यासह इतर प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. स्वेरीचे क्रीडा मैदान नुकतेच नव्या रुपात तयार झाले असून खेळाच्या दृष्टीने अत्यंत सुलभ असे झाले. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वेरीने जय्यत तयारी केलेली आहे.