2024 च्या विधानसभेला केलेल्या कामाच्या भरवश्यावर पुन्हा जनतेसमोर ताठ मानेने जावू-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंगळवेढा उपास सिंचन योजनेला नवीन दरसुचीनुसार निधी देवून स्व.सुधाकरपंत परिचारक व आवताडे यांना दिलेला शब्द पुर्ण करु!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढ्यातील प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात आ.आवताडे यांनी केलेल्या कामाच्या मागण्याची नोंद घेतली असून मागणी केलेले सर्व प्रश्न मार्गी लावून भविष्यात कामाच्या भरोश्यावर पुन्हा मत मागण्यास जावू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नंदूर येथे बोलताना व्यक्त केले. आवताडे शुगर अॅन्ड डिस्टलरीज प्रा.लि.च्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे होते.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,मोदीच्या निर्णयामुळे ऊस कारखानदारी जीवंत राहिली.त्यानंतर सातत्याने एफ आर पी वाढवण्यात आली.एफ आर पी देण्यासाठी सक्षम करण्यासाठीची मिनीमम सेलिंग प्राईजचा आध्यादेश काढला.कारखानदारांनी उपपदार्थावर भर दिला पाहिजे,कारण इथेनालच्या माध्यमातून दोन पैसे मिळाल्याने वेळेत एफ आर पी शक्य होते.मोदीना साखर कारखानदारीतील काय कळते म्हणणारे आज मान्य करतात की आता पर्यंत सर्वाधिक निर्णय घेतले,सातत्याच्या पावसाने नुकसान झाले तरी 65 मि.मी अट न ठेवता मदत सुरू केली.मागील सरकारने नियमित कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना 50 हजार देण्यास टाळाटाळ केली मात्र शेवटी पांडूरंगाच्या इच्छा होती म्हणून शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेणारे सरकार अस्तित्वात आले आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे नी एका क्लिकवर 7 हजार कोटीची मदत केली.24 गावाच्या योजनेसाठी स्व-सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारात मी शब्द दिला पण सरकार आले नाही पण मी खात्रीने सांगीतले की मी पुन्हा येईन आता पाण्यासाठीच्या सगळ्या मान्यता घेतल्या असून नवीन दरसुची आल्यानंतर मंजूरी घेवू लोकांसमोर ताठ मानेने जाता येईल, बसवेश्‍वर स्मारक देखील पुर्ण करू चोखोबाच्या स्मारक आराखड्याला निधी देवूनही काम झाले नाही नव्या आराखड्याला मान्यता देवून हा प्रश्न देखील सोडवणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की,या भागाच्या विकासासाठी आ.आवताडेनी झोकून दिले.त्यास उपमुख्यमंत्रीच पाठबळ देत आ.आवताडेचे समाधान केले,केंद्र सरकारमुळे साखर कारखानदारी टिकून आहे.मी शेतकऱ्यांचा नेता भासवून शेतकरी मागे फिरत राहिला पाहिजे या भुमिकेतून खेळवत ठेवले.दिल्लीत शिष्टमंडळ न्यायचे आणि रिकाम्या हाती परत आणायचे,20 वर्षे साखर कारखानदारी सांभाळायला दिली त्यानीच ती विकायला निघाली,याचे प्रायश्चित्त कोण करणार,कारखानदारीत आवताडे नी सुखाचा जीव दुखात घातला. जो उद्योग हातात नाही त्या उद्योगात दर वाढ झाल्यास कोण आंदोलन करते का ?असा प्रश्न करत कारखानदारी शेतकय्राच्या हातात आहे.सहकार कसा चालवायचे हे परिचारकाकडून शिकले पाहिजे. आ.आवताडे म्हणाले की,महाविकास सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून पांडुरंग आशिर्वाद घेताना उपमुख्यमंत्र्यामुळे बंद झालेला नंदूरचा कारखाना सुरू केला.त्यातून हजारोना रोजगार मिळाला.तीन महिन्यात 600 कोटीचा निधी मतदारसंघासाठी दिला असून मंगळवेढ्याचे राजकारण पाण्यावर झाले या पाण्याने राजकारणाची आग भडकावली.718 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्रीच तगादा लावत आहे.बसवेश्वर व चोखोबा स्मारक,भिमा नदीच्या पात्रात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,गादेगाव व निंबोणी ग्रामीण रूग्णालय,ग्रामीण रूग्णालयाचे सामान्य रूग्णालयात वर्ग,अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,पौट साठवण तलावाचा प्रश्न,माण नदीला कालव्याचा दर्जा देण्याची मागणी करताना ऊसदराचा प्रश्न देखील सोडवण्याची मागणी केली. यावेळी खा.जयसिंध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.सुभाष देशमुख,आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील,आ.राम सातपुते,आ.शहाजी पाटील,लक्ष्मण ढोबळे,प्रशांत परिचारक,हर्षवर्धन पाटील,संजय आवताडे,सचिन जाधव,शशिकांत चव्हाण,विष्णुपंत आवताडे,सोमनाथ आवताडे,विनायक यादव,प्रदीप खांडेकरआदी उपस्थित होते. सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यानी तर आभार बापू मेटकरी यांनी केले.                      शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांची घोर निराश!    मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते. परंतु शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही घोषणा झाले नाही. आज आपल्या तालुक्यातील आमदार उस दाराची कोंडी फोडतील पण तसे न झाल्यामुळे अनेक शेतकरी होवून सभेतून निघुन जावू लागले.मंगळवेढा तालुक्यातील नुकसान भरपाई संदर्भात ही कोणती पाऊले उचले गेले नाहीत.आपल्या तालुक्यातील महसूल प्रशासन पंचनामे करण्यासा टाळाटाळ करत आहेत मागील पंधरा वर्षापासून चालल्या उपसा सिंचन,बसवेश्वर स्मारक ,चौखामेळा स्मारक या व्यतिरिक्त चालु समस्यावर भाष्य न झाल्यामुळे अनेक शेतकरी नाराज झाल्याचे दिसून आले!

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.