तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 79 उमेदवारी अर्ज दाखल!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 18 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 79 असे एकूण 88 उमेदवारी अर्ज बुधवारअखेर प्राप्त झाल्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांनी सांगितले.

मंगळवेढा तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारले जात आहेत. जनतेतून १८ सरपंच आणि १५४ सदस्य अशा १७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. गाव नेत्यांकडून आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गावनिहाय संख्या उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे -भालेवाडी-सरपंचपद 1,सदस्य-9,पौट -सरपंचपद 1,सदस्य-13,ढवळस सरपंचपद 1,सदस्य 5,शिरनांदगी- सरपंचपद 0,सदस्य -3,मारोळी -सरपंच 0,सदस्य -3,डोंगरगांव-सरपंच-3,सदस्य-8,हाजापूर -सरपंच 1,सदस्य-3,येड्राव -सरपंच1,सदस्य-13,मारापूर-सरपंच 1,सदस्य-11,सोड्डी -सरपंच 0,सदस्य -4,तळसंगी सरपंच -0,सदस्य -2,पाटखळ -सरपंच 0,सदस्य -4,तर खोमनाळ,बावची,रहाटेवाडी,गोणेवाडी,फटेवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्यासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.                                                  दि.2 डिसेंबरच्या दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत असून दि.5 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर दि.7 रोजी दुपारी 3.00 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे व 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय आवारात 12 टेबल ठेवण्यात आले असून यासाठी 7 मंडल अधिकारी,18 तलाठी,पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आदी कर्मचारी नेमले आहेत. निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक उमाकांत मोरे हे परिश्रम घेत आहेत.

 

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.