प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन-अॅड.कोमल ढोबळे- साळुंखे
मंगळवेढा(प्रतिनिधी)शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा भाजपचे प्रांतिक माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.कोमल ढोबळे- साळुंखे यांनी दिली. आज सहा वाजता ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित नाटक ‘वास इस दास’ सादर होणार आहे. रात्री नऊ वाजता कवी संमेलन होणार आहे. यामध्ये इंद्रजित घुले, नारायण पुरी, अविनाश भारती, शिवाजी बंडगर, अनंत राऊत, खलील मोमीन, डी. के. शेख, नितीन चंदनशिवे, भरत दौंडकर, शिवाजी सातपुते, रमजान मुल्ला आणि तालीब सोलापुरी हे सहभाग घेणार आहेत. गुरुवारी दुपारी चार वाजता नागरी सत्काराचे आयोजन शाहू शिक्षण संस्था, बहुजन रयत परिषद व सावली फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता ‘माझे जगणे होते गाणे’ यावर संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा संगीत रचनाची मैफल होणार आहे. हे सर्व कार्यक्रम जुन्या पोलिस स्टेशन समोरील मारुती पटांगण येथे होणार आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जयसिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, शहाजी पाटील, राम सातपुते, महेश लांडगे, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, तहसीलदार मदन जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, पोलिस निरीक्षक रणजित माने, उद्योगपती रमेश गालफाडे,भाजपा जिल्हा संघटनमंत्री शशिकांत चव्हाण, माजी आमदार राजीव आवळे, अॅड. सुजित कदम,अब्राहम आवळे, अभिजित ढोबळे, अरुण किल्लेदार, नंदकुमार हावनाळे, पै. मुरलीधर सरपळे, पै. मारुती वाकडे, तालीम परिषदेचे कार्याध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, पै. रावसाहेब मगर,प्रवीण खवतोडे, प्रकाश गायकवाड, प्रशांत यादव, सिद्राम जावीर, ज्ञानेश्वर भगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहू परिवार, सावली फाउंडेशन आणि बहुजन परिषदेचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.