मंगळवेढा शहरात शिवजन्माचा आनंद उत्सव सर्वत्र साजरा होत असताना, एखाद्या गरीब कुटुंबात मदतीचा दिवा लावण्याचा उपक्रम दरवर्षी हे मंडळ करीत आहे. यावर्षी दामाजी कॉलेजमध्ये शिकणारा कॉलेजचा आदर्श विद्यार्थी, उत्कृष्ट कबड्डी व कुस्तीपटू,ज्याच्या हस्ते 26 जानेवारीला महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले त्या शंकर यल्लाप्पा धोत्रे या वडार समाजाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कबड्डी पंच परीक्षेची प्रीलियम व मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील महिन्यात ट्रेनिंग साठी बेंगलोर येथे जाणाऱ्या या विद्यार्थ्याचे जीवन फार हलाखीचे आहे. मंगळवेढा येथे गुराच्या दवाखान्यासमोर कापडापासून बांधलेल्या तंबूत राहणारा हा वडार समाजाचा हा विद्यार्थी कॉलेज नंतर वीट भट्टी वर व मिळेल तिथे मजुरीचे काम करतो. घरात कोणतीही व्यवस्था नाही. साधी लाईटची सोय नाही. कौतुकाने मिळालेली बक्षीस ठेवण्यासाठी घरात जागा नाही, अशा एका तरुणाचा सत्कार मंडळातर्फे शाल फेटा व रोख पाच हजार एक रुपये देऊन करण्यात आला. यावेळी प्रा.संतोष आसबे यांनी बोलताना सांगितले की, आयुष्यात दगड फोडून संपूर्ण आयुष्य दगडाच्या पाठीमागे राहणाऱ्या या उपेक्षित समाजातील गुणवंत विद्यार्थ्याला शोध घेऊन त्यांना मदतीचा हात देऊन समाजप्रवाहात आणण्याचे काम कौतुकास्पद आहे. त्यावेळी राम पवार यांनी सांगितले की, मंडळ दरवर्षी अशा एखाद्या असहाय कुटुंबाला मदतीचा हात देत आहे. गेल्या वर्षी स्मशानात राहणाऱ्या स्मशान जोगी कुटुंबाला मदत करून सतत त्यांना सहकार्याची भावना आज अखेर ठेवली आहे. तसेच या विद्यार्थ्याला सुद्धा आयुष्यात कधीही अडचणीत मदत करण्याची भूमिका मंडळाची राहील.मावळ खोऱ्यात मां.जिजाऊ व छत्रपती शिवाजी राजे सुद्धा गरीब कुटुंबांना भेटी देणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांच्या घरी मुक्काम करणे, त्यांच्या सोबत जेवण करणे अशा कृतीमुळे लोकांच्या मनातून राजा महाराजांची भीती घालवणे व राजा आपलाच आहे अशी भावना निर्माण करणे ह्या महाराजांच्या गुणाची आज आवर्जून आठवण झाली. तसेच आयुष्यात यश मिळत असताना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवून त्यांना घेऊनच ही परिस्थिती बदलून दाखवण्याबाबत इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार स्वतः शंकर धोत्रे यांनी भावनिक होऊन हृदयपूर्वक मानले. यावेळी पत्रकार प्रशांत मोरे,विठ्ठल फुगारे,अॕड.राजू शेख, विकास मोरे, प्रा.युवराज पवार,अनिल दत्तू, राम गवळी,अशोक जावळे,अशोक लेंडवे,जहांगीर दरवाजकर,अजय मुढे,आनंद हजारे,प्रकाश मुळीक, इसहाक शेख,संतोष ढोबळे,राजू उघाडे इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होते.
Check Also
Close