दुध दर वाढीसाठी अभिजीत पाटील यांनी घेतली दुग्ध विकास मंत्री यांची भेट

मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील दूध दरवाढीच्या समस्येबाबत महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.
पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसाय हा प्रमुख घटक आहे २ महिन्यांपूर्वी ४० रुपये पर्यंत दुधाला दर मिळत होता. सद्यस्थितीला हा दर २५ रुपये पर्यंत येऊन ठेपला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील दूध व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे. चालू वर्षी पर्जन्यमान ही कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय ओळखला जातो. त्यामुळे शासनाने नव्याने नेमलेल्या निर्णयानुसार दूध व्यवसाय धारकांना योग्य दर मिळून न्याय मिळावा या दृष्टीने चर्चा करून बैठक लावण्याबाबत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पत्राद्वारे निवेदन दिले.