मंगळवेढा(प्रतिनिधी)आ. ह. विचार वारी या विचार सोहळ्याचे आयोजन मंगळवेढ्यात दि. 28 व 29 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असून त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची
माहिती कवि इंद्रजित घुले यांनी दिली.
महाराष्ट्रातून या विचार सोहळ्यासाठी सैराटचे नागराज मंजुळे,सह साहित्यिक व कलाकार,पत्रकारासह अनेक मान्यवर दिग्गज विचारवंतांची, लेखकांची उपस्थिती लाभणार असून शनिवार दि 28 रोजी स. 10 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यात डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते मान्यवरांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर होणार्या परिसंवादामध्ये महावीर जोंधळे, राजन खान, कॉ. तानाजी ठोंबरे, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. जगदीश कदम, डॉ. श्यामसुंदर मिरजकर हे लेखक, विचारवंत विचार मांडणार आहेत.
दुपारी 3. 30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आ . ह . विचारस्पर्श… परिवर्तनाची नांदी हा आ. ह.मित्रांचे मनोगत आणि विचारसंवाद संपन्न होणार आहे. यामध्ये वैचारिक अनुवांचे, परिवर्तनाचे दर्शन मनोगतातून प्रकट होणार आहे. विचारविश्वाचा अनोखा प्रवास उलगड जाताना महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलावंत, चित्रकार, लेकख कवींची हृद्य मनोगते संपन्न होणार आहेत. रात्री 8 वाजता पारंपरिक धनगरी ओव्यांच्या कार्यक्रमामध्ये संत नामदेव जन्माख्यान सादरकर्ते : शाहीर सागर माने आणि सहकारी सादरीकरण करणार आहेत.
रविवार दि. 29 रोजी स. 10 वाजता परिसंवाद संपन्न होणार असून यामध्ये डॉ. प्रशांत गायकवाड, दीपा देशमुख यांचे विचार प्रकट होणार आहेत. स. 11 वाजता मुलाखत आम्हाला उजेड हवा या सदरात डॉ. आ. साळुंखे यांची मुलाखत संपन्न होणार असून त्याचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे करणार असून ही मुलाखत महावीर जोंधळे, डॉ. राजेंद्र दास, प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, शोभाताई काळुंगे हे घेणार आहेत. दुपारी 2 वाजता डॉ. आ. ह. साळुंखे लिखित क्षमाप्रार्थना आणि कृतज्ञता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिग्दर्शक कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार असून या प्रकाशन सोहळ्यास राजन खान, डॉ. रणधीर शिंदे, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य उपसंचालक प्रदीप आवटे, पत्रकार विजय चोरमारे, प्राजक्ता हनमघर, दीपा देशमुख, डॉ. नवनाथ शिंदे, अपर आयुक्त जी.एस.टी. पुणेच्या वैशाली पतंगे, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. राजेंद्र दास प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर हे मान्यवर प्रमुख उपस्थितीत आहेत. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या मनोगतांनी या विचार वारीचा समारोप होईल. या विचार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आ.ह. विचार वारी संयोजन समितीच्या वतीने कवी इंद्रजित घुले यांनी केले आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.