मंगळवेढा(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या फुटी नंतर शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच दौरा असणार आहे. सोलापूर येथील कार्यक्रम झाल्यानंतर सांगोला कडे जाताना मंगळवेढा नगरीत शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी बोलताना सांगितले.
मंगळवेढा तालुका हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते नेतेमंडळी यांनी जोरदार तयारी केली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांना मानणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे जंगी स्वागतासाठी येण्याचे आवाहन केले आहे.
खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उद्या मंगळवेढा येथे दुपारी १२वाजता माचणूर चौक येथे स्वागत व तिथून रॅली निघेल तसेच मंगळवेढा शहर लगत पहिल्या ब्रीज पासून बोराळ नाक्यापासून दामाजी चौकाकडे रवाना होऊन दामाजी चौक येथे आगमन होणार आहे. तसेच शिवप्रेमी चौकात सत्कार समारंभाचे आयोजन असल्याचे सांगितले आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.