माझे शरीर साथ देत नाही;तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही-मनोज जरांगे-पाटील

मंगळवेढा(प्रतिनिधी) 17 दिवसाच्या आंदोलनाने माझे आज शरीर साथ देत नाही.दररोज सलाईन लावावी लागत असली तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील यांची मंगळवेढ्यात यल्गार सभा आयोजित केली. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,आंतरवाली येथे मराठा आंदोलनात माता माऊली चार चार महिन्याची लेकरे घेवून बसलो असताना अचानक हल्ला करून माता माऊलीचे डोके फोडून चेहरा दिसत नव्हता इतका विद्रुप केला.त्यात 75 वर्षाच्या वयोवृद्धाला सोडले नाही. लोकशाही पध्दतीने आमचे आंदोलन सुरू असताना हल्ला करण्याचे कारण काय याचे उत्तर सरकारने अद्याप दिले नाही.आमचे आंदोलन मोडण्यासाठी हल्ला घडवून आणला.तो हल्ला महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजावर हल्ला होता.पाच हजार कागदाचा पुरावा सापडल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सकसकट प्रमाणपत्र द्यावे लागेल. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही.मराठा आणि कुणबी एकच असलेले अनेक पुरावे होते.चर्चेसाठी अनेक
मातब्बर नेते पाठविले.त्यांना मराठ्याची पोटजात का होवू शकत नाही,असा प्रश्न विचारताच त्याची बोलती बंद झाली.सगळे निकष मराठा समाजाचे पार केले.गायकवाड कमीशनने मराठा 12 टक्के मागास असल्याचे सिध्द केले. वंशावळी असलेल्याना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा शासन निर्णय घेवून आले. पण वाचल्यावर पण त्यात खुट्टी मारली होती.
आपल्याला आतापर्यंत खूप खेळ खेळलाय. आता तरी भानावर येवू असे आवाहन करत शेवटचा लढा द्यायचा.आता माघार घ्यायची नाही.आरक्षणासाठी 40 वर्षे गेली.आता 40 दिवसाचा वेळ देवू ,जी समाजाची वेदना ती मांडतोय.हे आंदोलन सामान्य मराठ्यानी हातात घेतले असून त्यात दोन गट पाडू शकत नाही.आंतरवालीतील विराट रूप बघून शासनाला निर्णय घ्यावा लागेल.

मी प्रश्न विचारले की साहेबाला विचारून येतो म्हणायचे पण पट्या आलाच नाही..आपण साधा सोपा प्रश्न विचारतो किचकाटत शिरत नाही. पण जातीवंत शेतकऱ्याचा पोरगा असल्याने मला कशाची गरज नाही. समाजच माझे मायबाप,घरातून बाहेर पडताना बायकोचो कंकू पुसून सांगीतलं जगलो तर तुझा नाय जगलो तर समाजाचा. प्रास्तावित सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माऊली पवार म्हणाले की,मराठा आरक्षणात आंतरवाली घटना घडल्यावर जिल्ह्यात सर्वात जास्त आंदोलने मंगळवेढ्यात झाली.मनोज जरांगे पाटीलांनी मराठा आरक्षणाचा घास अंतीम टप्प्यात आणलाय.14 ऑक्टोबर ला पुर्ण ताकदीने आंतरवली जायचे.सभेचे सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.