जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी खा.शिंदें नी उपोषणस्थळी भेट द्यावी : दत्तात्रय भोसले
मंगळवेढा(प्रतिनिधी) चाळीस वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत संघर्ष करत आहे शासन स्तरावर याबाबत हालचाली होत नाहीत त्यांची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही यासाठी त्यांना पाठिबा देण्यासाठी अंतरवाली सराठी येथे जाऊन त्यांचा आवाज दिल्ली दरबारी पोहचवण्यासाठी काम करावे अशी मागणी मंगळवेढा शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भोसले यांनी खा प्रणिती शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे
या पत्रात त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोलाचे सहकार्य आहे सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षण व सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे हे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी असल्याने अद्याप त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही मात्र नवनिर्वाचित खासदार म्हणून आपण तात्काळ पाठिंबा व सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे असे लिहले आहे,
सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे मराठा समाजाने मोठी ताकद उभी केली व त्या विजयी झाल्या सध्या आरक्षणासंबंधी सुरू असलेल्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री व अन्य राज्यस्तरीय नेते भेटी देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत अशात खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आग्रही भूमिका मांडली पाहिजे ही मतदार संघातील सकल मराठा समाजाची भावना आहे यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी समाजाच्या भावना लक्षात घेत अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन पाठिंबा द्यावा अशी लेखी मागणी दत्तात्रय भोसले यांनी केली आहे