मंगळवेढा(प्रतिनिधी) मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी सोलापूर ते सांगली प्रवासादरम्यान मंगळवेढा पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉ प्रियदर्शनी कदम-महाडिक यांच्या माहेश्वरी आर्ट गॅलरी येथे भेट दिली.
गुरुवारी दुपारी सांगली येथे मराठा आरक्षण शांतता रॅली आयोजित केली असल्याने सांगलीकडे जात असताना त्यांनी मंगळवेढा येथील कदम यांच्या फॉर्म हाऊस वर माहेश्वरी आर्ट गॅलरी ला भेट दिली व स्वागत स्वीकारले यावेळी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतीवर आधारित उत्पन्न तसेच ज्वारी प्रक्रिया उद्योग याबाबत चर्चा केली माहेश्वरी आर्ट गॅलरी या संस्थेकडून निर्माण करण्यात आलेल्या कॅनव्हास पेंटिंग ची पाहणी केली व या संस्थेच्या कलाकार व सहकाऱ्याशी चर्चा केली याप्रसंगी या भागातील भौगोलिक परिस्थिती व मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीवर देखील उपस्थित असलेल्या मान्यवरांशी भाष्य केले सुरुवातीस शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील महिलांनी मनोज दादा जरांगे पाटील यांचे औक्षण केले यानंतर त्यांना अश्वारूढ पुतळा समितीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाची माहिती सांगितली याप्रसंगी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यासह मराठा महासंघ मराठा सेवा संघ डॉ बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.