मंगळवेढा(प्रतिनिधी) विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली. दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावापासून मी दौरा सुरू केला होता. विधानसभेतही आवाज उठवला होता, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रविवारी अनवली, एकलासपूर, सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
दरम्यान, मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदोपत्री होती. त्याला सुशीलकुमार शिंदे आणि भारत भालके यांनी मान्यता दिली होती. मात्र, त्याला ती मिळाली नव्हती. मंगळवेढा तालुक्यात गाव भेट दौरा केला. त्याचबरोबर विधानसभेत आवाज उठवला. एकंदरीत विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळे योजना मंजूर झाल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर भीमा नदीकाठच्या गावांना चार तास वीज पुरवठा करण्यात येत होता. याबाबत पाठपुरावा करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. तीव्र उन्हाळा होण्याआधी उजनीच्या पाण्याचे नियोजन योग्य झाले पाहिजे. दरम्यान, उजनीच्या नियोजनाबाबत बैठकीला कोणत्याही आमदाराला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नियोजनाअभावी शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळत नसल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले आहे.
सोलापूरसाठी काहीही देऊ शकले नाही हे दुर्दैव
सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामाटात सत्तेवर आले मात्र सोलापूर साठी काहीही देऊ शकले नाही हे सोलापूरचे दुर्दैव आहे. लोकांचा वापर करून ते सत्तेत आले. आज त्यांना त्यांची गरज असताना ते त्या लोकांसोबत उभे राहत नाहीत, असे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.
लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई
लोकशाही वाचवण्यासाठी ची ही लढाई आहे. भाजपचे काही खासदार संविधान आम्हाला बदलायचे आहे, असं ऑन रेकॉर्ड म्हणाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान जसेच्या तसे ठेवण्यासाठी लढाई लढतोय भाजप आमचा शत्रू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे सर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, शिवसेवा ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे, सुधीर भाऊ अंभगराव, जयवंत माने, बंडू घोडके, पूनम ताई अंभगराव, साक्षी भिसे, मंगेश बोरोडे, संगिता ताई पवार, पूर्वा ताई पांढरे, अरूण जाधव, गोकूळ जाधव, राष्ट्रवादीचे नागेश फाटे संदिप पाटील, अमर सूर्यवंशी, शंकर सुरवसे आदि पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या उपस्थित संख्येने उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.