मंगळवेढा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी प्रशांत साळे यांची निवड!
मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांनी केलेली निवड प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी कायम करत जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी केलेल्या निवडीवर शिक्कामोर्तब्ब केले.
नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी यांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मोहिते पाटील घराण्याशी फार जुन्या काळापासून असलेले संबंध सुशीला साळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेले काम व दलित मित्र बाबासाहेब साळे यांनी काँग्रेस पक्षाला दिलेले योगदान विचारात घेऊन प्रशांत साळे यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती मात्र या निवडीवर तत्कालीन अध्यक्ष अॅड नंदकुमार पवार यांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी पवार यांनी माझा निवडीवर आक्षेप नाही मात्र निवड प्रक्रिया राबवताना आपणाला वरिष्ठांनी विश्वासात घेतले नसल्याचे खंत पक्षनिरीक्षकासमोर व्यक्त केली. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे तो अहवाल पक्ष निरीक्षकांनी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी शिक्कामोर्तब करत जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रशांत साळे यांना तालुका अध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र सुपूर्द केले. निवडीवर नाराज झालेले अॅड नंदकुमार पवार यांना जिल्हाउपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण भागात शाखा काढून पक्षाची बांधणी मजबूत करून तालुक्यातील शेतीचे पाणी, पिण्याचे पाणी व दक्षिण भागातील इतर समस्यांच्या संदर्भात इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत घेऊन आवाज उठवण्याबरोबर प्रसंगी आंदोलन करण्यात असल्याची सांगितले.