
मंगळवेढा(प्रतिनिधी) खडकी येथे बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून कपाटातील 75 हजार रुपये किंमतीच दागिने चोरुन नेल्याप्रकरणात आरोपी जयवंत दिलीप काळे (वय 35) याला पकडण्यात तीन महिन्यानंतर पोलीसांना यश आले असून त्याला गजाआड करण्यात आले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी यातील फिर्यादी बलभिम लवटे हे राहत्या घराला कुलूप लावून सांगोला येथे गेले होते. दुपारी 2.30 ते 7.30 च्या दरम्यान बंद घराचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून वरील चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 5 ग्रॅम वजनाच्या तीन पिळ्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. या चोरीप्रकरणाच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी विशेष पथके तयार करुन त्याचा शोध घेतला असता वरील आरोपीला चोरीच्या संशयावरुन ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली असल्याचे पोलीसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव,डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.