Uncategorizedपंढरपूरमंगळवेढासोलापूर

मंगळवेढा तहसील कार्यालयात इच्छुकांची मांदियाळी…! सरपंचपदासाठी 119 उमेदवारांनी तर सदस्यत्वासाठी 625 अर्ज दाखल केले!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.अर्ज भरण्यासाठी शेवटी दिवशी तहसील आवारात मोठी गर्दी झाली होती.18 ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी 119 तर सदस्य पदासाठी एकूण 625 अर्ज प्राप्त झाल्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांनी सांगितले.

मंगळवेढा तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारले जात आहेत. जनतेतून १८ सरपंच आणि १५४ सदस्य अशा १७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. गाव नेत्यांकडून आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

अर्ज दाखल झालेली गावनिहाय संख्या उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-खोमनाळ सरपंचपदासाठी 6 तर 35, भालेवाडी-सरपंच 5 ,सदस्य-31 ,पौट-सरपंच 6,सदस्य 31,बावची सरपंच 10,सदस्य 24,गुंजेगाव सरपंच 5,सदस्य 34,ढवळस सरपंच 9,सदस्य 37,शिरनांदगी सरपंच 6,सदस्य 40,मारोळी सरपंच 8,सदस्य 32,रहाटेवाडी सरपंच 3,सदस्य 27,डोंगरगाव सरपंच 8,सदस्य 52,हजापुर सरपंच 3,सदस्य 10,गोणेवाडी सरपंच 6,सदस्य 38,येड्राव सरपंच 9,सदस्य 39,मारापुर सरपंच 7,सदस्य 41,सोड्डी सरपंच 5,सदस्य 28,तळसंगी,सरपंच 5,सदस्य 54,पाठखळ,13 सदस्य 49 तर फटेवाडी,सरपंच 5,सदस्य 23 असे एकूण सरपंचपदासाठी 119 तर सदस्यपदासाठी 625 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दि.5 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर दि.7 रोजी दुपारी 3.00 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे व 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.तर 20 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक उमाकांत मोरे यांनी सांगितले.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close