महादेव चौगुले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान!

टेंभुर्णी (प्रतिनिधी) येथील श्री संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळेचे इंग्रजी विषयाचे अध्यापक श्री महादेव चौगुले सर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित सन्मानित करण्यात आले.

सामाजिक जनजागृतीला सर्वश्रेष्ठस्थानी मानणाऱ्या ठाणे येथील पारस काव्य, कला, जनजागृती संस्थेच्या वतीने
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी म्हणून महादेव अण्णाप्पा चौगुले यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र प्रदान करत ज्येष्ठ साहित्यिक कुंडलिक म्हात्रे, संत कबीरांचे वारसदार संजय बर्वे, मानवाधिकार यशवंत कुर्वे नागपूर, यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश चांदिवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरविण्यात आले.

कला, साहित्य, संस्कृती, समाज, शिक्षण, पत्रकार, कृषी, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्यांसाठी सदरील पुरस्कार दिला जात असून महादेव चौगुले यांचे शालेय शिक्षण क्षेत्रातील भरीव आणि उल्लेखनीय कार्याबद्दलची दखल आणि नोंद घेत सदरील पुरस्कार विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता जागृती म्हणून दिला गेला असल्याचे मत यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कुंडलिक म्हात्रे यांनी व्यक्त केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल टेंभुर्णी आश्रम शाळेमध्ये श्री महादेव चौगुले सर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.जय तुळजाभवानी माध्यमिक,कला व विज्ञान कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी,श्री संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संतोषी आगावणे यांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कारांमधील सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन चौगुले सरांना गौरविण्यात आले…‌.
चौगुले सरांचे कौशल्यपूर्ण अध्यापनकार्य, शिक्षणाबाबतची तळमळ, विद्यार्थी केंद्रित आत्मजागरूकता आणि सहकार्य वृत्ती या गुणांची कदर म्हणून सदरचा पुरस्कार त्यांना लाभला असल्याचे स्पष्ट मत शालेय संस्कृतिक विभागाचे नवनाथ नांगरे सर यांनी यावेळी व्यक्त केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासजी सातपुते ,मुख्याध्यापिका,शिक्षकवृंद आणि समस्त विद्यार्थ्यांनी चौगुले सरांचे मनापासून अभिनंदन केले असून टेंभुर्णी शहर आणि परिसरात सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.