
मंळळवेढा(प्रतिनिधी) लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक सोलापूर संचालक मंडळाची निवडणूक सन 2022-23 ते 2027-28 पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन उज्वला संजय चेळेकर यांना मंगळवेढा तालुक्यातून प्रथमच संचालक होण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आ.सुभाष (बापू ) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकमंगल सहकारी बँकेची सोलापूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यात विविध शाखा कार्यरत असून बँकेची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेच्या चालू पंचवार्षिक संचालक मंडळामध्ये सुभाष बापू देशमुख साहेबांनी मंगळवेढ्याला उज्वला संजय चेळेकर यांच्या माध्यमातून संचालक होण्याची मंगळवेढ्याला प्रथमच संधी दिली आहे . त्याबद्दल मंगळवेढ्याच्या शहर व ग्रामीण भागातून उज्वला संजय चेळेकर यांचे अभिनंदन होत आहे.
उज्वला संजय चेळेकर या कला शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांचे पती संजय शंकर चेळेकर हे नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत नूतन संचालक म्हणून जिल्हा पतसंस्थेवर दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी निवडून आलेले आहेत.
उज्वला चेळेकर यांच्या सासूबाई श्रीमती मीराबाई शंकर चेळेकर यांनी यापूर्वी मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा म्हणून काम पाहिलेले आहे.
तसेच त्यांच्या नणंद संगीता सिद्धेश्वर काळुंगे-चेळेकर यांनी दामाजी शुगरच्या संचालिका म्हणून काम पाहिलेले आहे.
तसेच सासरे लक्ष्मण तात्या चेळेकर,दीर राजाभाऊ चेळेकर व भावजय सुनिता सुखदेव घुले ( काकडे ) ,माजी सरपंच हरिभाऊ घुले, येणकी या सगळ्यांचा सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने आ. सुभाष बापूंनी संधी दिल्याचे चर्चिले जात आहे.