मोहोळ(प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद विद्यालय मोहोळ येथे पोक्सो अॅक्ट बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा या विषयावर विधी साक्षरता शिबिर विधी सेवा समिती मोहोळ व विधीज्ञ संघ मोहोळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स.वा. ठोंबरे दिवाणी न्यायाधीश मोहोळ हे होते. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश प्र.ग.महाळंकर मुख्याध्यापक शशिधर पाटील,सुधीर नाईकनवरे ॲड.व्ही. टी. धावणे,ॲड.कांबळे हे विधीज्ञ उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी पी.एम.माने यांनी पोक्सो अॅक्ट बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा मुलांना समजेल अशा भाषेत सांगितला.
अध्यक्षीय भाषणातून स. वा. ठोंबरे यांनी गूड टच व बॅड टच याबद्दल सविस्तर माहिती सांगून मुलांच्या मनातील भीती दूर केली.कायद्यामधील तरतुदी समजावल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रगती जाधव यांनी केले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.